crime

रांजणगाव MIDC मध्ये गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना एकाचा मृत्यू तर एक जखमी

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये एका मालवाहतूक ट्रकमध्ये हवा भरत असताना टायर फुटल्याने एका कामगारा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयराम हिरदुराम कश्यप (वय २२, सध्या पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. किरवामुडापरा, ता.मादलापाल, जि. बस्तर, राज्य छत्तीसगड) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत रविकांत सुरेश कुमार (वय ४०, रा. ढोकसांगवी, ता.शिरुर जि. पुणे मुळ रा. जगदीशपुर ता. बरवीरंगा जि. शेखपुरा राज्य बिहार) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम कश्यप हा मालवाहतूक स्टेपणीमध्ये हवा भरण्याचे काम करत होता. त्यावेळी हेल्पर अखिलेश कुमार हा त्याला मदत करत असताना फिर्यादी रविकांत कुमार यांना अचानक मोठा आवाज आल्याने ते पळत मालवाहतूक ट्रक जवळ आले. तेव्हा स्टेपणीचा टायर फुटलेला दिसला. तसेच तेथे काम करणारा जयराम कश्यप हा स्टेपणीचे बाजुला पडलेला होता आणि त्याच्या तोंडावर आणि डोक्यास मार लागून रक्त येत होते. तसेच हेल्पर अखिलेश कुमार याला देखील हातास मार लागला होता.

त्यानंतर या दोघांना तातडीने शिरुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वी जयराम कश्यप हा मृत झाला असल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…