राज्यात तिसरा पर्याय उभा राहणार; नाथाभाऊ शेवाळे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): मुंबई येथे प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांच्या माध्यमातून प्रतिनिधी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्रातील 16 घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक, व आमदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित राहून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील घडत असलेल्या राजकीय घटना याविषयी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेकाप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी, भारतीय रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे संस्थापक अध्यक्ष ऍड.डॉ.सुरेश माने, माजी मंत्री सौ.मीनाक्षी पाटील, प्राध्यापक जाधव सर, जनता दलाचे प्रदेश प्रधान महासचिव प्रताप होगाडे, किसान सभेचे काँ. अशोक ढवळे, प्रभाकर नारकर, रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. बापूसाहेब देशमुख, आदी उपस्थित होते.

राज्यात या प्रागतिक पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न घेऊन जण आंदोलन उभे करण्याचा व येणाऱ्या विधानसभा, लोकसभा, निवडणुकीत सक्षम तिसरा पर्याय उभा करण्याचा निर्णय अनेक वक्त्यांनी बैठकीत बोलून दाखवला यावेळी आमदार भाई जयंत पाटील यांनी विभागावर मेळावे घेऊन प्रागतिक पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून आपल्या भाषणात बोलताना सांगितले.