Bhairavanath Savindane

सविंदणे येथे भैरवनाथ महाराज यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा ५ व ६ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती सविंदणे गावचे सरपंच व उपसरपंच यांनी दिली आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळी ८ ते ९ देव जन्माचे कीर्तन, मांडव डहाळे, देवाचा विवाह सोहळा, बैलांची मिरवणूक त्यानंतर सकाळी १० ते ०६ बैल गाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा शर्यती साठी एकूण २,७८,८९२ इनाम ठेवण्यात आला आहे. नं १ च्या गाड्यास ७५,५७५, नंबर २ च्या गाड्यास ५११५१.नंबर-३ च्या गाड्यास ४११४१. नंबर ४ च्या गाड्यास ३११३१.नंबर ५ च्या गाड्यास २११२१. फायनल साठी नंबर १च्या गाड्यास २१००१. नंबर २ च्या गाड्यास १५००१,नंबर-३ च्या गाड्यास ११००१ अशी रोख बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. रात्री ८ ते ११.शेरणी ,रात्री १२ ते ०६ देवाचा छबिना, काठ्या पालखी चा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळी ०६ ते ०८ हनुमान जन्म उत्सव, ९ ते १२ कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडी कर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा हजेरी चा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. या कार्यक्रमासाठी पुणेकर, मुंबईकर तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.