शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभासदांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह ठरत असुन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संस्थेने सभासदांना एकूण ८ लाख ७१ हजार ७९६ रुपयांचा लाभांश जाहीर करत तो लाभांश सभासदांच्या खात्यात वितरित करण्यात आला.

हा लाभांश संस्थेचे संस्थापक व संचालक आणि शिंदोडी गावचे माजी सरपंच रंगनाथ वाळुंज यांच्या हस्ते देण्यात आला. ८ लाख ७१ हजार ७९६ लाभांशापैकी ६ लाख ४२ हजार १४३ रुपये बचत खात्यात वर्ग करण्यात आले असुन २ लाख २९ हजार ६५३ रुपये रोख स्वरुपात सभासदांना देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल वाळुंज, उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे सचिव राजेंद्र वाळुंज तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. दि १६ सप्टेंबर १९६३ रोजी संस्थापक /अध्यक्ष आप्पासाहेब काशिनाथ वाळुंज यांच्या सहकारी चळवळीच्या बळावर उभी राहिलेली शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची गेल्या १० वर्षात चांगली आर्थिक वाटचाल सुरु आहे. गेल्या ६२ वर्षात पहिल्यांदाच शिंदोडी सोसायटीच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला आहे.
दि ३१ मार्च २०२४ पर्यंत संस्थेचे सभासद वसूल भाग भांडवल ५८ लाख ११ हजार ९७० रुपये असुन बँक कर्ज देणे २ कोटी २९ लाख ५३ हजार ५३४ रुपये तर सभासदांकडुन येणे असलेले कर्ज ३ कोटी ९४ लाख १६ हजार ०३० इतके आहे. तर संस्थेची एकुण गुंतवणूक ३४ लाख ७५ हजार १७७ रुपये असून, त्यापैकी इमारत निधी ४ लाख ८९ हजार ४८७, राखीव निधी ४ लाख ४० हजार २३०, बँक भाग खरेदी २५ लाख ४५ हजार ४०० अशी विभागणी करण्यात आली आहे.
शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या या प्रगतीबद्दल सभासदांकडुन समाधान व्यक्त करण्यात आले असून, संचालक मंडळाने भविष्यात अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक व समाजाभिमुख कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष संपत वाळुंज, एकनाथ वाळुंज, सुनिल वाळुंज, बलभिम वाळुंज, सोपान वाळुंज, शिवाजी वाळुंज, राजेंद्र वाळुंज संचालक एकनाथ शिंदे, सावित्राबाई वाळुंज, शिवाजी ओव्हाळ, संजय शितोळे, तज्ञ संचालक विठ्ठल फडके, रामदास गाडीलकर, पोलिस पाटील भास्कर ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदोडी विकासोच्या अध्यक्षपदी स्वप्निल वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड
गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर
शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना