मुखई आश्रम शाळेचा राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत इतिहास

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून नवा इतिहास घडवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने कोल्हापूर संघाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात विशेष कामगिरी करत महाराष्ट्र राज्य शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या मुलींच्या संघामध्ये गीता पारकर, समीक्षा मेचे, अंजली राठोड, सिद्धी गावडे, श्रद्धा गावडे, श्रेया इंगळे, प्रज्ञा मलगुंडे, स्मृती सांगळे, नीता घोडे, प्रतीक्षा काळे, सिद्धी झुरंगे, सानिष्का दोरगे, श्रेया यादव व आर्या शिरसाट या खेळाडूंनी विशेष परिश्रम घेत आपल्या संघाला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक मनोज धिवार, हनुमंत जाधव व सविता लिमगुडे यांनी मार्गदर्शन केले तर सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे, कार्यकारी अधिकारी मंगेश मोरे व प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी अभिनंदन केले आहे.