शिरूर (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचे आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून, नक्की कोण बाजी मारणार?, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात यंदा रंगत आली होती. दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार झाला आहे. पण, शरद पवार यांनी सभेदरम्यान दिलीप वळसे पाटील यांचा गद्दार उल्लेख करून त्यांना परभूत करा, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या विधानाचा दिलीप वळसे पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे वळसे पाटील हेच निवडूण येणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
देवदत्त निकम यांनाही मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे देवदत्त निकम हे बाजी मारू शकतात, असे अनेकांचे मत आहे. शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची जोरदार लढत झाली असून, निवडणूक निकालानंतरच गुरू-शिष्याच्या लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल. आंबेगाव विधानसभेसाठी ७०.५६ टक्के मतदान झाले आहे.
Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार
शिरुर तालुक्यात रात्री मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क
Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार
Video: आंबेगाव-शिरुर मतदार संघांचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याशी थेट बातचीत…