उठा, सज्ज व्हा! छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

महाराष्ट्र

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने उद्या (7 मे) छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात 16 ठिकाणी युद्धाच्या तयारीची मॉकड्रील आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे नागरी भागांमध्ये घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजना यांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. उद्या महाराष्ट्रातील खालील शहरांमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील आणि नागरिकांना ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसे जावे याचे प्रशिक्षण दिले जाईल.

महाराष्ट्रातील १६ ठिकाणे जिथे उद्या मॉकड्रील होणार आहे

छत्रपती संभाजीनगर

उरण-जेएनपीटी

तारापूर

पुणे

ठाणे

नाशिक

थळ-वायशेत

रोहा-धाटाव-नागोठाणे

मनमाड

सिन्नर

पिंपरी-चिंचवड

मुंबई

भुसावळ

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

हायअलर्ट! केंद्र सरकारच्या या मॉक ड्रिलमुळे महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालकमंत्री आणि इतर मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे.