करंदीत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

शिरूर तालुका

महिलांनी लुटला हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) सह परिसरात श्रावण महिन्यातील महत्वाचा असा पहिलाच नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून दोन वर्षांनी प्रथमच नागपंचमी पूर्णपणे खुल्या पद्धतीने साजरा होत असल्याने महिलांनी हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद लुटल्याचे देखील दिसून आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे नागपंचमी सन साजरा होत असताना गावातील सर्व महिलांनी नागपंचमी निमित्ताने गावातील केंदूर रोड लगत असलेल्या मारुती मठ येथे एकत्र येत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले. दोन वर्षानंतर प्रथमच कोणत्याही निर्बंधाशिवाय सन साजरा होत असल्याने महिलांनी देखील समाधान व्यक्त करत येथे फुगड्या तसेच झोका खेळण्याचा आनंद लुटला असल्याचे दिसून आले, तर सन मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे समाधान असल्याचे पोलीस पाटील वंदना साबळे, तुळसाबाई खेडकर, रुपाली खेडकर, रिया साबळे, पूजा खेडकर, चैताली साबळे, सिमा नप्ते, तेजल साबळे, अर्चना नप्ते यांनी सांगितले. यावेळी महिलांकडून मारुती मठ येथे नागदेवतेची पूजा करण्यात आली. तर गावामध्ये मोठ्या उत्साहात नागपंचमी सन साजरा होत असल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.