शिरुर ‘बालमित्र ग्राम’ अभियान करुणामय समाजाची नांदी ठरेल; सुमेधा कैलाश

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करुन आपण समाजातील पिडीत लोकांना दया आणि करुणा दाखवली. तर बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि सामाजिक दुष्कृत्ये दुर होतील. तसेच प्रकारच्या समस्यांचे निराकरण आणि समाधान शक्य असल्याचे प्रतिपादन सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशनच्या सहसंस्थापक सुमेधा कैलाश यांनी केले.

 

रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० मार्च २०२५ रोजी बालमित्र ग्राम कारवाँचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुमेधा कैलाश यांनी या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला.

 

‘बाल मित्रग्राम कारवाँ’ हि ‘कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन’ द्वारे चालवली जाणारी एक राष्ट्रव्यापी जनजागृती मोहीम आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण भारतातील मुले, महिला आणि तरुणांना सुशिक्षित, निरोगी आणि सुरक्षित बनवणे आहे. या अभियानांतर्गत पथनाट्य, गाणी, भित्तीलेखन, सामुदायिक बैठका, पत्रिका वाटप अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पथनाट्य संघाने “बाल मित्र ग्राम, भविष्याकडे दयाळू गाव” या विषयावर सादरीकरण केले.

 

या कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जगताप यांनी केले. यावेळी जय जाधव, निशांत नरके आणि सानवी कुल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून शिरुर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड अमित खेडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरुरचे पशु संवर्धन विकास अधिकारी डॉ ऋषिकेश जगताप, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, CDPO वैशाली सटाले, शिरुर ग्रामीणच्या सरपंच कु शिल्पा गायकवाड आदी मान्य उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी संचालक राकेश सेंगर, सुत्रसंचालन सुनीता टोणगे तर आभार राणी कर्डिले यांनी मानले.

शिरूर तालुक्यातील भुमाफिया बंटी-बबलीचा कारनामा; दोन उद्योजकांना घातला गंडा

रांजणगाव गणपती येथे एकाच जमिनीची दोनदा विक्री; दिपक पंचमुख यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल

शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक

कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त