रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुदामराव गणपतराव कुटे (वय ६७) यांचं शुक्रवार दि २० डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, एक भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सुदामराव कुटे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन वाटचाल करत एक मुलगा आणि दोन मुलींच शिक्षण पुर्ण करत संसाराचा गाडा हाकला. तीस वर्षांपुर्वी रांजणगाव परिसरात औद्योगिक वसाहत उभी राहिल्यानंतर छोट्या टपरीतुन सुरवात करत ‘हॉटेल संदीप’ नावाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर हळूहळू व्यवसायात भरारी घेतली. पुणे-नगर महामार्गावरील सुप्रसिद्ध ‘हॉटेल संदीप’ चे मालक उद्योजक संदीप कुटे हे त्यांचे पुत्र होत.

लंडन’ च्या पाहुण्यांनी घेतला ‘हॉटेल संदीप’ च्या जेवणाचा आस्वाद