रामलिंग महाराजांच्या पालखी उत्सवानिमित्त शिवसेनेकडून अल्पोहर व ज्युस वाटप  

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): रामलिंग (ता. शिरूर) येथिल प्रसिद्ध देवस्थान रामलिंग महाराज यांचा यात्रा महोत्सव महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा होत आहे. शिरूर शहरासह तालुका व महाराष्ट्रभरातून नागरीक मोठया संखेने दर्शनासाठी येत असतात. शिरुर शहरातून (दि. १७) रोजी रामलिंग महाराजांची पालखी पायी पायी निघाली असून (दि. १८) रोजी पहाटे ती पोहचणार आहे.

या महाशिवरात्री यात्रा पालखी उत्सव निमित्त (दि. १७) रोजी शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने सर्व भाविकभक्तांना अल्पोहर व शितपेय (ज्यूस) वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी दानशूर उद्योगपती प्रकाश धारिवाल, आमदार अशोक पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल पाचर्णे , मा.नगरसेवक नितीन पाचर्णे, शिरूर शहर प्रमुख सुनील जाधव, तालुका प्रमुख शिरूर आंबेगाव गणेश जामदार, युवासेना शिरूर शहर अधिकारी स्वप्निल रेड्डी, शिवसेना युवानेते अविनाश घोगरे, महेंद्र येवले, पोपट ढवळे, संजय ढवळे,सुनील जठार, राजेंद्र चोपडा,खुशाल बापू गाडे, हाजी आसिफ शेख,रणजित गायकवाड, आकाश क्षीरसागर, सोनू काळोखे, सिद्धीर्थ चव्हाण, आकाश चौरे, अविनाश जाधव, संजय काळे, संपत दसगुडे, राहूल भोते, रविंद्र गुळादे, शुभम मुत्याल, सागर नरवडे, सुशांत कुटे,नितीन काळे, राहूल मोहळकर, सागर पांढरकामे, निसार शेख, याच्यासह असंख्य शिवसैनिक युवासैनिक व सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर पस्थित होते.