Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी 20 दिवस उलटूनही कारवाई नाहीच…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

नातेवाईक तक्रार द्यायला पुढे न आल्याने फाईल बंद…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील 33 वर्षीय अंजली गायकवाड या महिलेने सुसाईड नोट लिहीत (दि 8) मे रोजी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. अंजली यांनी लिहिलेल्या सहा पानी सुसाईड नोटमध्ये रांजणगाव MIDC तील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे नाव असताना मागील 20 दिवसात पोलिसांनी त्याला साधे चौकशीलाही बोलविन्याची तसदीही घेतली नाही. तसेच अंजली यांचे आई-वडील फिर्याद देण्यासाठी आल्यास आम्ही आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास तयार असल्याचे पोलिसांनी वारंवार सांगितले. परंतु अंजलीच्या आई- वडिलांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दर्शविल्याने हि फाईल बंद होणार असल्याचीच चिन्ह दिसत आहेत.

अंजली गायकवाड प्रकरणी सुरवातीपासूनच “शिरुर तालुका डॉट कॉम” ने निर्भीडपणे वृत्तांकन करत आवाज उठवला होता. तसेच अंजली गायकवाड यांनी लिहिलेली सुसाईड नोटही पहिल्यांदा “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या हाती लागली होती. त्यानंतर शिरुर पोलिसांनी एका चांगल्या मध्यस्तामार्फत सुसाईड नोट ताब्यात घेत संदीप कुटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. परंतु सुसाईड नोट मध्ये नाव असलेला आणि ज्याच्या त्रासाला वैतागून अंजली गायकवाड यांनी आत्महत्या केली. त्या बांधकाम व्यावसायिकाची मात्र शिरुर पोलिसांना साधी चौकशी सुद्धा करायची गरज वाटली नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात सुद्धा शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या…

अंजली गायकवाड प्रकरणात सुसाईड नोट मध्ये नाव असलेला रांजणगाव MIDC तील बांधकाम व्यावसायिक हा खुप श्रीमंत असुन त्याने या प्रकरणात मोठया प्रमाणात संबंधित अधिकाऱ्यांना “मलिदा” खाऊ घातल्याचीही नागरिकांमध्ये दबक्या आवाजात जोरदार चर्चा असुन एखाद्या सर्वसामान्य माणसाने अजाणतेपणे साधी चुक केली तर त्याला कायद्याचा बडगा दाखविणारे पोलिस मात्र अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला मात्र साधं चौकशीला सुद्धा बोलवत नाहीत हे न सुटणार कोडं आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर माजी खासदारांनी व्यक्त केली नाराजी…

शिरुर तालुक्यात अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा असतानाच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात अवैध धंदे, दरोडे आणि गुन्हेगारी वाढली असुन याबाबत शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टिका करत नाराजी व्यक्त केली. माजी खासदार आढळराव पाटील यांनी नुकताच पिपंरखेड, टाकळी हाजी, मलठण तसेच शिरुरचा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शिरुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक याचं कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं असुन घरफोड्या, महिलांवर अत्याचार, चोऱ्या असे अनेक प्रकार सध्या सुरु असुन याबाबत मी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्याशी बोललो असुन सध्याचे पोलिस निरीक्षक हे बदलीवर असल्याचे कळले म्हणून तुम्ही जाताना माझ्या मतदार संघातल्या शिरुर तालुक्याच वाटोळं करुन जाणार का अशी टिका त्यांनी केली.