‘लंडन’ च्या पाहुण्यांनी घेतला ‘हॉटेल संदीप’ च्या जेवणाचा आस्वाद

खव्वयेगिरी मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर महामार्गावर असलेल्या ‘हॉटेल संदीप’ या हॉटेल मधील शाकाहारी जेवणाचा थेट लंडन वरुन आलेल्या पाहुण्यांनी आस्वाद घेत चवीची तारीफ केली. तसेच लंडन मध्ये असे महाराष्ट्रीयन जेवण मिळत नसल्याचे सांगत पुन्हा भारतात आल्यानंतर नक्की ‘हॉटेल संदीप’ येथे जेवण्यासाठी येणार असल्याचेही आवर्जुन सांगितले.

 

पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपतीच्या पुढे तीन किमी अंतरावर उद्योजक संदीप कुटे यांचे ‘हॉटेल संदीप’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये मराठावाडा आणि विदर्भातुन पुण्याकडे जाणारे तसेच पुण्यातुन मराठावाडा आणि विदर्भाकडे जाणारे अनेक ग्राहक या हॉटेल मधील शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेत असतात.

 

त्यामुळे मुळ भारतीय आणि सध्या लंडन येथे स्थायिक असलेले उद्योजक केदार लेले हे रांजणगाव येथे महागणपतीच्या दर्शनाला आलेले असताना त्यांनी ‘हॉटेल संदीप’ येथे शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. हॉटेल मधील स्पेशल बेसन भाकरी आणि बैंगन भरता या शाकाहारी भाज्यांची तारीफ करत ‘लंडन’ मध्ये अशी अस्सल गावराण भाजी मिळत नसल्याचे सांगितले. तसेच पुन्हा भारतात आल्यानंतर आवर्जुन रांजणगाव येथील ‘हॉटेल संदीप’ येथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येणार असल्याचेही आश्वासन दिल्याचे हॉटेलचे मालक उद्योजक संदीप कुटे यांनी सांगितले.