शिरुरमधील न्यायालयाने आरोपीस सुनावली 6 वर्षे सक्त मजुरी तसेच केला 10 हजार रुपये दंड 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत निमोणे येथे दि. ११ मार्च २०१७ रोजी आरोपी अलिम पासीन शेख याने उज्वला बाळू गाडेकर या महिलेस शरीरसुखाची मागणी केली होती. महिलेने त्यास नकार दिल्याने त्याने चिडून जावून त्याच्या हातातील चाकूने सदर महिलेचा गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

याबाबत शिवाजीनगर सेशन कोर्टात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय पुणे कोर्ट श्याम चांडक यांच्याकडे सुनावणी सुरु होती. यातील साक्षीदार व पुरावे तपासून न्यायालयाने अलिम पासीन शेख (रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या आरोपीस ६ वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक जी. ए .क्षीरसागर, अतिरीक्त सरकारी वकील मिलिंद दातरंगे, पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, कोर्ट पैरवी कर्मचारी पोलिस कॉन्स्टेबल रेणुका भिसे, एस .बी. रणसर, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या गुन्ह्याचे कामकाज पाहीले.