crime

अहमदनगरमध्ये युवकाला न्यायाधीशांसमोरच मारहाण; कारण…

अहमदनगर: भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच मारहाण करण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून या युवकाला मारहाण करण्यात आली आहे. अमाल हुंबे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. स्वातंत्र्यदिनी अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर काही जणांनी भारताविरोधी घोषबाजी केली होती. या युवकांना पोलिसांनी न्यायालयसमोर हजर केले होते. मात्र, सुनावणी सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

शिरुरमधील न्यायालयाने आरोपीस सुनावली 6 वर्षे सक्त मजुरी तसेच केला 10 हजार रुपये दंड 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत निमोणे येथे दि. ११ मार्च २०१७ रोजी आरोपी अलिम पासीन शेख याने उज्वला बाळू गाडेकर या महिलेस शरीरसुखाची मागणी केली होती. महिलेने त्यास नकार दिल्याने त्याने चिडून जावून त्याच्या हातातील चाकूने सदर महिलेचा गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा […]

अधिक वाचा..

काँग्रेस आमदारांना दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ; नाना पटोले

मुंबई: आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विकास निधी नाही दिला तर […]

अधिक वाचा..

भाटी गावातील जूनी हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात जात ही शरमेची बाब…

मुंबई: भाटी गावातील १०० वर्षांपेक्षाही जास्त काळ जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात जातं ही शरमेची बाब आहे, अशी भूमिका मांडत शासनाने याबाबतीत सविस्तर खुलासा करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. आमदार अस्लम शेख याबाबत बोलताना म्हणाले, मालाड- पश्चिम, भाटी कोळ्यावाड्यात १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी हिंदू स्मशानभूमी आहे. १९५५ साली मालमत्ता पत्रक […]

अधिक वाचा..

अन्याय दूर करा अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल; बाळासाहेब थोरात

मुंबई: राज्य सरकारने ज्या 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे सरकारने अन्याय दूर करावा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर नामांतराची याचिका न्यायालयाने फेटाळली

शहरांची नावे बदलण्याचा अधिकार सरकारचा औरंगाबाद: छ. संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात मोहंमद हाशम उस्मानींसह इतरांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तर बुधवारी याचिकाकर्त्यांकडून वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी औरंगाबाद नामांतरविषयक अधिकाऱ्यांनी जारी केलेली अधिसूचना कोर्टापुढे सादर करत, शहराप्रमाणेच जिल्हा आणि तालुक्याचेही नाव बदलले आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर कोर्टाने सुनावणीस नकार दिला आहे. तर कोणत्याही […]

अधिक वाचा..

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पॅनल स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत…

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी असे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले असून या निर्देशाचे स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा एक ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे लोकशाही आणखी […]

अधिक वाचा..

शिंदे सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर ३४ नव्हे ४० खासदार निवडून येतील…

मुंबई: ‘इंडिया टूडे सी वोटर मुड अॉफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा ४० च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. […]

अधिक वाचा..

भिडेवाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडा

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती शिक्रापूर (शेरखान शेख): पुण्यातील भिडेवाड्याला महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व असून या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्याच्या महाधिवक्त्यांना केली आहे. पुणे येथील भिडे वाड्याचा राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे…

कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही; अजित पवार नागपूर: सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार […]

अधिक वाचा..