RANJANGAON

इंस्टाग्रामवर तलवारीचे फोटो टाकुन दहशत करणाऱ्या दोन इंस्टाकिंगच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) कारेगाव परिसरात राहणाऱ्या दोन युवकांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या पोज मध्ये धारधार तलवारीचे फोटो टाकुन दहशत पसरवत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडुन (दि 28) रोजी दुपारच्या सुमारास रांजणगाव MIDC पोलिसांना माहिती कळताच सदरच्या दोन्ही इंस्टाकिंग भाईंच्या विरोधात पोलिस हवालदार विलास आंबेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी फिर्याद दिली असल्याने गुन्हा दाखल करत त्या दोघांचा शोध घेत आनंद ऊर्फ रुद्रा विठ्ठल रोकडे (वय 24) आणि नामदेव खुशाल कल्लाळे (वय 22) दोघेही (रा. कारेगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद ऊर्फ रुद्रा रोकडे याने त्याच्या x_rudra_007_x या इंस्टाग्राम अकाउंटवर तलवारीसह फोटो आणि त्याखाली “गुन्हेगार क्षेत्र S S ग्रुप of Company, CRIMINAL, नाम ही काफी हैं” असा मजकूर टाकुन तसेच नामदेव कल्लाळे याने स्वतःच्या kalhale_namdev या इंस्टाग्राम अकाउंटवर धारदार तलवारी सोबत वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो टाकुत असल्याचे निदर्शनास आले. हे दोघेही कारेगाव तसेच परिसरातील दहशत पसरवत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही इंस्टाग्राम अकाउंटवर जात त्याची खातरजमा करुन घेतली असता या अकाउंटवर सदर दोन्ही युवक तलवारीसह फोटो टाकुन दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर यांना या दोघा इंस्टाकिंग भाईंना अटक करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक करुन त्यांच्या जवळ असणाऱ्या दोन्हीही तलवारी जप्त केल्या आहेत. या दोन्हीही घटनेचा पुढील तपास हवालदार गणेश आगलावे व संदीप जगदाळे करत आहेत.