रांजणगाव गणपती येथे उद्या मॅरेथॉनचा थरार, सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर मुख्य आकर्षण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गेल्या पाच वर्षापासून आर एम धारिवाल फाउंडेशन तसेच महागणपती फाऊंडेशन यांच्या माध्यमातून “रांजणगाव मॅरेथॉन” ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा या स्पर्धेचे सहावे वर्ष असुन उद्या (दि 17) डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता स्पर्धा सुरु होणार असून सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर या स्पर्धेच मुख्य आकर्षण असणार आहे. दरवर्षी प्रमाणेच या स्पर्धेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महागणपती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी दिली.

‘रांजणगाव मॅरेथॉन 2023 ‘ हि स्पर्धा उद्या रविवार (दि 17) रोजी रांजणगाव एमआयडीसी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजमुद्रा चौक) येथे होणार असुन या स्पर्धेसाठी शिरुरचे खासदार अभिनेते डॉ अमोल कोल्हे, आर एम धारीवालच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन, उपाध्यक्षा शोभा धारीवाल, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनित बालन, सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन महागणपती फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी केले असुन या स्पर्धेची सुरवात सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवुन होणार आहे.