तीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांकडून सेवापुर्ती निमित्त माजी सैनिक बांधवांचा सत्कार

शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) चिंचोली मोराची (ता. शिरुर) येथे विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई येथील एस. एस.सी. गोल्डन बॅच 1993 तर्फे 93 च्या बॅचमधील निवृत्त सैनिक सुभेदार दत्तात्रय ननवरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चिंचोली मोराची येथे सुभेदार संतोष नाणेकर यांच्या श्री महाळसाकांत पर्यटन स्थळावर सत्कार समारंभ पार पडला.

त्यावेळी 1993 च्या बॅचमधील माजी दत्तात्रय ननवरे, कैलास शेडगे, हरि पुंडे, मेजर शंकर गारगोटे, नवनाथ मापरे, संतोष नाणेकर, आदक यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शहीद जवान सतोष गाजरे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या पत्नी यांनाही गौरविण्यात आले.

त्याप्रसंगी बॅचमधील प्रसिद्ध उद्योजक केरबा नाणेकर, पुण्यातील सोलारीत जिमचे मॅनेजर धनाजी लांघे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र धुमाळ, एल. आय. सी.चे संतोष वाळके, जेष्ठ बागायतदार मच्छिंद्र शिंदे, स्वाती नाणेकर, रोहिदास संकपाळ, भाऊसाहेब मिडगुले, मोहन मिडगुले, मछिंद्र पुंडे, कैलास नाणेकर, गोरक्ष करंजकर, संजय नाणेकर, चंद्रकांत धुमाळ, कैलास धुमाळ, संतोष साळे, अशोक घोलप, आशिक तांबोळी, सुभाष धुमाळ, वंदना वाबळे, गोरक्ष टाव्हरे, रेखा कुंभार, रंजना वाळुंज आदी उपस्थित होते.

सर्व माजी सैनिकांना पुढील आयुष्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी धनाजी लांघे यांनी शुभेच्छा दिल्या तर मछिंद्र धुमाळ यांनी आपली बँच एक कुटुंब असून एकमेकांनी सर्वांना सामाजिक, आर्थिक मानसिक सहकार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबा गोरडे यांनी केले तर विनायक गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.