शिरुर शहरात खंडणीसाठी सिनेस्टाईल अपहरण करत प्राणघातक हल्ला

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील मुबंई बाजार येथे घरासमोरून शतपावली करत असताना अभिषेक गंगावणे या युवकाचे ११ इसमांनी खंडणीसाठी अपहरण करुन त्याला दशक्रिया घाटात नेऊन त्याला तलवार हॉकीस्टीक व रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार (दि १५) सप्टेबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शिरुरच्या हददीत मुंबई बाजार येथे अभिषेक गंगावने हा घरासमोर शतपावली करत असताना सहा सिटर रिक्षा मधुन विशाल काळे , उमेश जगदाळे, अविष्कार लांडे, अक्षय परदेशी हे तलवार, लोखंडी रॉड तसेच हॉकी स्टीक घेऊन तसेच इतर दोन अनोळखी व्यक्तीसोबत येउन फिर्यादी गंगावने यास १० लाख रुपयाची खंडणी मागुन फिर्यादिला मारहाण करत बळजबरीने त्यांनी आणलेल्या रिक्षा मध्ये बसवुन अपहरण करुन शिरुर येथील दशक्रिया घाट येथे घेऊन गेले.

त्यानंतर 1) विशाल काळे, 2) उमेश जगदाळे, 3) अविष्कार लाडे, 4) अक्षय परदेशी 5) क्लास ननवरे, 6) देवानंद चव्हाण, 7) हर्षल काळे, 8) रूपेश लुनिया, 9) अमोल लुनिया, 10) दादा खिलारी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा.शिरूर ता. शिरूर जि.पुणे व दोन अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही) यांनी त्यांच्या टोळीसाठी १० लाख रुपयाची खंडणी मागुन बेकायदा गर्दी जमाव जमवुन दहशत निर्माण करत उमेश जगदाळे, रुपेश लुनिया यांनी लोंखडी रॉडने, देवानंद चव्हाण, हर्षल काळे व कैलास ननवरे यांनी फिर्यादीस हॉकीस्टीकने दोन्ही पायावर हातावर, डोक्यात मारत दुखापत केली आणि बाकीच्यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली.

तेव्हा विशाल काळे याने फिर्यादीला जीवे मारण्याचे उददेशाने त्याच्याकडील तलवारीने डोक्यात वार केला .परंतु तो हुकल्याने फिर्यादीचा जीव वाचला. त्यानंतर 11 ) गोपाल यादव रा. शिरूर ता. शिरुर जि. पुणे याने फिर्यादीला फोन करून तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहेत.