पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची

आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी झोप का महत्वाची आहे ते पाहूया. यासाठी झोपलेल्या अवस्थेत शरीरात कोणती कार्ये होत असतात याची माहिती घेऊया.

१) झोपेत शरीरातील ऊर्जेचे संवर्धन होते. या अवस्थेत शरीराच्या हालचाली अत्यल्प असल्यामुळे ऊर्जेची बचत होते. अभ्यासक सांगतात ८ तासाच्या झोपेमुळे ३५% टक्के ऊर्जेची बचत होते. यामुळेच शांत झोपून उठल्यावर आपण ताजेतवाने होतो.

२) दिवसभरात ग्रहण केलेल्या माहिती पैकी उपयुक्त माहिती दीर्घकाळासाठी स्मरणात ठेवण्यासाठी ती योग्य ठिकाणी साठवली जाते आणि अनावश्यक माहितीचा कचरा मेंदूतून काढून टाकला जातो. त्यामुळे झोपून उठल्यावर मेंदू तरतरीत आणि ग्रहणक्षम बनतो.

३) दिवसभरात पेशींची मोडतोड किंवा झीज होते. पेशींच्या दुरुस्तीचे आणि पुनरुज्जीवनाचे कार्य झोपेतच होते. त्यामुळेच झोप पूर्ण झाली असेल तर शरीर पुढील दिवसासाठी सक्षम होते.

४) रोगप्रतिकारक शक्ती बळकट बनविणे, इन्सुलिनचा योग्य वापर करणे आणि हृदयावरचा भार कमी करण्याचे कार्यही झोपेतच होते.

५) झोपेत आपण काही खात नाही म्हणूनच भुकेचे जे दोन हार्मोन्स आहेत ghrelin आणि leptin यांचे नियंत्रण योग्य प्रकारे होते. त्यामुळे वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरुन साभार)