पावसाळ्यात ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर

आरोग्य

पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. त्याबाबत जाणून घेऊयात…

१) चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात.

२) आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच पचनक्रिया सुधारते.

३) गवती चहा देखील शरीरास गुणकारी आहे. त्यामधील औषधी गुणांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.

४) काळी मिरी वा दालचिनी घातलेला चहा इन्सुलिन सेन्सिव्हिटी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो.

५) वेलची आणि जायफळ यांची पावडर करुन ती चहामध्ये वापरल्यास ताजेतवाने वाटते.

(सोशल मीडियावरून साभार)