आंबा खाण्याचे फायदे व गुणधर्म 

आरोग्य

गुणधर्म

बलदायक, रूचकर, पाचक, विर्यवर्धक, पौष्टिक, पित्त व वायुहारक, A व C Vitamins भरपूर इ.

फायदे

१) पुढील आजार झाल्यास आंब्याच्या पानांच्या देठांचा चीक लावणे.

A) जळवाताने पायास भेगा पडल्यास भेगांना चीक लावा.

B) विंचूदंश / मधमाशीदंश झाल्यास चीक लावा.

C) रांजणवडी झाल्यास रांजणवडीला चीक लावा.

२) मुळव्याध: सावलीत सुकवीलेल्या कोयीचे (बाठ ) चूर्ण + गुळ + मध घ्या.

३) जुलाब: कोयीचे चूर्ण + पाणी घ्या.

४) डोळ्यांच्या तक्रारी पिकलेले आंबे खाल्यास कमी होतात.

५) पिकलेले आंबे आतड्यांसाठी उत्तम टॉनिक आहे. पचनशक्ती सुधारते.

६) ज्यांना मलावरोध आहे त्यांच्यासाठी पिकलेले आंबे अमृतासमान आहेत. आवश्य खा.

७) आंबा चोखून खाल्याने लवकर पचतो.

८) मात्र कापून खाल्याने पचनास जड असतो.

९) आंबापोळी खाल्याने मल सैल होतो. पोट साफ राहते.

१०) नेहमी गोड आंबे खाणे हिताचे असते. कच्ची कैरी खाल्याने त्रास होतो.

(सोशल मीडियावरून साभार)