हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खा, सर्दी पासून होईल सुटका

आरोग्य

हिवाळा आला की थंडीने हातपाय गोठून जातात. काहीवेळा लोकांना थंडीमुळे सर्दी होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावदेखील वाढतो आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थांचा समावेश करून थंडीपासून सुटका करता येऊ शकते.

गूळ: गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते.

सुका मेवा: हिवाळ्यात बदाम, बेदाणे, अंजीर यासोबतच सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स खावेत. या सर्व ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे हिवाळ्यात त्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.

तूप: हिवाळ्यात तूप खाणे खूप फायदेशीर आहे. तुपात आढळणारे हेल्दी फॅट हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवतात, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो. याशिवाय हिवाळ्यात तूप खाल्ल्याने त्वचेला ओलावा येतो.

हळद: हळद हे अनेक किरकोळ आजारांवरचे पहिले औषध आहे. जे सर्दी आणि विषाणूपासून आपले संरक्षण करण्यात खूप उपयुक्त ठरते. हिवाळ्यात कोमट दुधात हळद रोज प्यावी.

कांदा: हिवाळ्यात कांदा आपल्या शरीराला ऊब देतो. कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच हिवाळ्यात कच्च्या कांद्याचे पराठे आणि कांदा कचोरी खाऊ शकता.

(सोशल मीडियावरुन साभार)