किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम यांद्वारे केले जाते. या अवयवांच्या कार्यात अडथळे आल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच किडनी आणि लिव्हर या दोन्हीचे काम सुरळीत चालणे आवश्यक असते. किडनी किंवा यकृत खराब झाले तर इतर अवयवांवर त्याचा ताण येतो आणि तेही निकामी होण्यास सुरुवात होतात.
किडनीतील फिल्टर खराब झाल्यास युरिक एसिड, अमोनिया, युरिया, क्रिएटीनिन, अमिनो एसिड, सोडियम, पाणी वाढते. असे होऊ नये किंवा झाले असल्यास नियंत्रणात राहावे यासाठी नेमकं काय करायला हवं? आपला आहार, झोप, व्यायाम हे सगळे चांगले असणे आवश्यक असते. त्यासाठी एका खास पेयाचा आहारात समावेश करायला हवा. अगदी झटपट होणारे हे डीटॉक्स ड्रिंक नियमित प्यायल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो.
डीटॉक्स ड्रींकचे फायदे
१) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत होते.
२) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३) रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर असते.
४) किडनी डीटॉक्स होण्यासाठी उपयुक्त असते.
५) एसिडीटी पासून सुटका होण्यास मदत करते.
कसं करायचं डीटॉक्स ड्रिंक
एक ग्लास पाणी घ्या. यात मूठभर ताजी कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. यात २ वेलदोडे घालायचे. हे सगळं मिश्रण एका पातेल्यात घेऊन चांगलं उकळून घ्यावं. आणि नतंर एका गाळणीने गाळून घ्यावं. कोथिंबीर आणि वेलदोड्याचा (विलायची) अर्क उतरल्याने किडनी लिव्हरसाठी हे ड्रींक अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी १ कप हे ड्रींक अवश्य प्यायला हवे.
(सोशल मीडियावरून साभार)