हळद वेलची दूध पिण्याचे फायदे

आरोग्य

हळद व वेलची या दोन्ही अमूल्य औषधी घटक मानल्या जातात. हळदीत अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल, अँटीएजिंग गुणधर्म असतात, तर वेलची पचन सुधारण्यास आणि त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी हळद वेलची मिसळलेले दूध पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

म्हातारपणाची प्रक्रिया धीमी होते: हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला वृध्द होण्यापासून संरक्षण देतात.

सुरकुत्या कमी होतात: त्वचेतील कोरडेपणा व झीज थांबवून वेलची आणि हळद त्वचेला गुळगुळीत करतात.

त्वचा टवटवीत राहते: रक्तशुध्दी व शरीरातील सूज कमी झाल्याने चेहऱ्यावर तेज येते.

झोप सुधारते: उबदार दूध, हळद व वेलची मन शांत करतात आणि शांत झोपेसाठी मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते: हळदीच्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे सर्दी, खोकला यांपासून संरक्षण मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)