व्यायाम व योगा करण्याचे फायदे…

आरोग्य

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते…

व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे…

व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.

3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो…

आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.

4) शरीराची कार्यक्षमता वाढते…

नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.

5) मन सकारात्मक राहते…

व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.

कंबर दुखी…

1) बाभळीची साल

१) बाभळीची साल काढायची.

2) पाण्यात टाकुन कडक उकळवा.

त्या पाण्याने गुढघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुवून टाखा. १० मिनटात फरक पडतो.

२) जवस

1) रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ झाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा.

२)जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुडखे दुखी ला खूप फरक पडतो.

3) पांढरे तीळ: खात जा, हाडे मजबूत होतात.

3) एरंडेल तेल…

1) भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

2) त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा.

3) पंधरा दिवस करा हे, याने गुढघे दुखी, कंबर दुखी बरी होते.

4) तिळाचे तेल

1) गुडखे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ – संद्याकाळ प्या.

2) त्या वर कोमट पाणी प्या.

3) पंधरा दिवसात गुडखे दुखी थांबते.

(सोशल मीडियावरुन साभार)