शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय? मग करा ६ उपाय करा

आरोग्य

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Top 6 Iron Rich Foods) रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. महिलांना ही समस्या सर्वाधिक उद्भवते. रोजच्या खाण्यातील ६ पदार्थ जर तुम्ही नियमित खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

रक्ताच्या कमतरतेची लक्षणं…

नेहमी थकवा येणं, दम लागणं, चक्कर येणे, अशक्तपणा, थंड हात आणि पाय सुन्न होणं, सुजलेली जीभ, वारंवार संक्रमण, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे, मुलांची वाढ खुंटणं, भूक न लागणे, कमकुवत नखे इत्यादी. यावर उपाय म्हणून लोहयुक्त अन्नाबरोबरच व्हिटॅमिन-सी देणारे अन्नही खा. जेवणानंतर कॉफी आणि चहा पिणे टाळा खाण्यापूर्वी धान्य भिजवा, क्विनोआ आणि शेंगा खा, जे लाइसिन एमिनो अॅसिड आणि लोह प्रदान करतात.

1) पालक अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांसह प्रत्येक सर्व्हिंगसाठी 15% DV प्रदान करते. त्यात महत्वाचे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. कच्चा आणि शिजवलेला पालक दोन्ही लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत. पालक शिजवल्याने तुमच्या शरीराला त्यातील पोषकद्रव्ये अधिक सहजपणे शोषण्यास मदत होते.

2) कोको पावडर आणि डार्क चॉकलेटमध्ये ब्लूबेरीपासून बनवलेल्या पावडर आणि ज्यूसपेक्षा जास्त अँटिऑक्सिडेंट असतात. चॉकलेटचा कोलेस्टेरॉलवर फायदेशीर प्रभाव पडतो आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो. चॉकलेट डोपामाइन नावाने ओळखले जाणारे आनंद संप्रेरक सोडते जे चिंता, तणाव आणि नैराश्याशी लढण्यास मदत करते. डार्क चॉकलेट तुमच्या आयर्नचे सेवन वाढवू शकते.

3) तुळशीच्या पानांनी अॅनिमिया कमी करता येतो. तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

४) लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात नट्चा समावेश करावा. खजूर, अक्रोड, बदाम आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. भिजवलेले मनुके आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने लोहाची कमतरता दूर होते.

५) लोहाची कमतरता दूर करण्यासाठीही डाळिंब उत्तम आहे. डाळिंबाचा रस प्यायल्याने अॅनिमियासारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.

(सोशल मीडियावरुन साभार)