सर्दी पडश्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपाय

आरोग्य

1) हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते.

2) निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल

3) तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्यायल्यास लाभ होईल.

4) गरम दुधामध्ये पेंडखजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी-ताप लवकर ठीक होईल.

5) एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून पोळीसोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळेल.

6) गुळामध्ये काळी मिरीचे थोडेसे चूर्ण टाकून हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घेतल्यास सर्दी-ताप ठीक होईल.

7) मोहरीचे तेल थोडेसे गरम करून छाती, पायांचे तळवे आणि नाकाला लावल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल.

8) दीड चमचा बडीशेपची वाफ घ्यावी. त्यानंतर थोडे पाणी प्यावे. त्यानंतर लगेच गरम दुध प्यावे. या उपायाने सर्दीमध्ये लगेच आराम मिळेल.

9) मनुक्यांची पेस्ट बनवावी. त्यामध्ये थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी. रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा हे मिश्रण घेतल्याने सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.

10) जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद झाले आहे तर, दालचीनी, काळी मिरी, विलायची आणि जिरे एकत्र करुन एका सूती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने आराम मिळेल. असे केल्याने तुम्हाला शिंक येण्यास मदत होईल आणि तुमचे बंद झालेले नाक मोकळे होईल

11) हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.

12) नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.

13) नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवाव.

(सोशल मीडियावरुन साभार)