पायामध्ये जळजळ, आग होणे व टाच दुखणे आणि होमिओपॅथीक उपचार…

आरोग्य

पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ, सोबतच संवेदना कमी होणे, त्रास जाणवणं या समस्या अनेकांमध्ये आढळतात. वैद्यकीय भाषेत या त्रासाला म्हणजेच पायांच्या नसांचे नुकसान होऊन जाणवणार्‍या या त्रासाला होमिओपॅथीक म्हणतात. पायाची जळजळ वाढण्यासोबतच अनेकांना तळव्यांवर सूज, लालसरपणा किंवा घाम येणं अशी लक्षण देखील आढळतात. पन्नाशीच्या जवळ असलेल्यांमध्ये होमिओपॅथीक चा त्रास अधिक तीव्रतेने आढळून येतो.

1) व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता: शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हातापायांमध्ये जळजळ किंवा संवेदना कमी होण्याचा त्रास होतो. अनेकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे चालताना त्रास होतो.

2) मधूमेह: वाढत्या वयानुसार मधूमेहींमध्ये neuropathy चा त्रास अधिक वाढतो. मधूमेहींमध्ये पायात जळजळ वाढण्याचा त्रास अधिक आढळतो.

3) मद्यपानाचे व्यसन: Neuropathy चा त्रास वाढण्यामागे मद्यपानाची सवय हेदेखील असू शकते. दारूमुळे नसांच्या टीश्यूचे नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी मद्यपानाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

4) औषधोपचार: काही औषधांमधील ड्रग्ज शरीरावर दुष्परिणाम करतात त्यामुळे पायांची जळजळ वाढते. डॉ. पझारे यांच्या मते, टीबीच्या औषधांमुळे, केमोथेरपी तसेच कॅन्सरची ड्रग्ज यांमुळे पायांची जळजळ वाढू शकते.

5) किडनीचे विकार: किडनीचे आजार असणार्‍यांमध्ये किंवा डायलिसीसवर असणार्‍यांमध्ये पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ जाणवते. काही वेळेस अशा रुग्णांमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रासदेखील जाणवतो.

6) एचआयव्ही: एचआयव्ही व्हायरसमुळे हातापायाची जळजळ वाढणे हा त्रास सहज आढळतो. त्याला peripheral neuropathy असं म्हणतात. यासोबतच स्नायू कमजोर होणं, वेदना जाणवणं, जळजळ वाढणं तसेच सुसंगती बिघडणे अशा समस्यादेखील वाढतात.

7) अ‍ॅनिमिया: बी12 व्हिटॅमिन्सच्या कमतरतेप्रमाणेच शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे जळजळ वाढते. रक्ताच्या चाचणीने आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याने त्याचे योग्य निदान करता येईल.

8) Lyme disease: एखादा कीटक चावल्यास किंवा प्राण्यांच्या लाळेतून, बाधित प्राण्याशी संपर्क आल्यानंतर वाढणारे त्रास या लक्षणाने ओळखले जातात. यामध्ये हाता-पायाची जळजळ वाढते. यामुळे तुमच्या घरात पाळीव प्राणी असल्यास घाबरू नका. हाता-पायाला होणारी जळजळ हे Lyme disease मधील प्रमुख लक्षण नाही.अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते.