वाढत्या वयात घ्यायची काळजी

आरोग्य

1) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते. त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो. चेहऱ्यावर मोठ्या आकारात छिद्रे दिसू लागतात. वयाच्या तीस वर्षा नंतर तेलकट वा संमिश्र त्वचेवर छिद्रे दिसायला लागतात. चांगल्या क्लिन्झरने त्वचा साफ करून टोनिंग केल्यास तेलकट त्वचेची छिद्रे कमी होतात.

2) संत्री, मोसंबी, इतर केशरी लाल फळे, गाजरे, भोपळा, बीट, आंबे यांचा आहारात समावेश असावा. आळशी बिया, अक्रोड इ. ओमेगा थ्री फॅटी आम्लयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्यावा, म्हणजे त्वचेवरील छिद्रे सुरकुत्या कमी होतील. तैलग्रंथींच्या सभोवती कोलेजन ताठर होऊन छिद्राची जागा घट्ट होईल.

3) ओठावर सारखी जीभ फिरवण्याची सवय बहुतेक लोकांना असते. त्यामुळे ओठ काळसर पडू लागतात. सूर्यप्रकाशात सारखे जाणे होत असल्यास त्यासाठी सन प्रोटेक्शन क्रीम लावावे. जसे UVA व UVB अशा दोन्ही क्रिया देणारे संयुक्त क्रीम लावावे. ओठांकरिता लीप बाम ज्यावर SPF १५ आहे असे विकत घेऊन लावावे.

4) वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर काळे तपकिरी डाग येऊ लागतात. मिनरल पावडर फाउंडेशन लावल्यास डाग हलके दिसतात. वारंवार चार ते पाच तासानंतर सनस्क्रीन लावावे. हातांना हॅन्ड लोशन लावावे. पर्स मध्ये ट्यूब ठेवल्यास अधून मधून लावण्यास सोपे जाते.

(सोशल मीडियावरून साभार)