मधुमेहावर नियंत्रण 

आरोग्य

आजच्या काळात कुठलेही आजार वयोगट बघत नाहीत, त्या मधून मधुमेह असा आजार आहे जो वडिलांपासून ते मुलांपर्यंत होतो. मधुमेह असल्यास त्याला नियंत्रित करणे महत्वाचे असते. मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच, पण स्वतःहून या गोष्टींचे पालन जरूर करा.

तांब्याचा भांड्यात पाणी प्या

तांब्याचा भांड्यात ठेवलेले पाणी पिणे सर्व आजारांसाठी फायदेशीर असते. तांब्याचा भांड्यात कॉपरअँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटी इंफ्लेमेटरीचे गुणधर्म असतात. जे मधुमेहास नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

मेथीदाणे खाणे

आपण दररोज १० ग्रॅम मेथी दाणे गरम पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याचे सेवन दररोज करावे. असे केल्यास टाइप-२ मधुमेहास नियंत्रित करण्यास मदत होते.

मिठाई पासून दूर राहावे

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ मिठाई पासून दूर राहणे पुरेसे नाही तर इतर खाद्य पदार्थात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारलं, कोरफड, आवळा या सारख्या गोष्टींचे सेवन मधुमेहा मध्ये फायदेशीर आहे.

(सोशल मीडियावरून साभार)