या समस्या असल्यास भेंडी खाऊ नका

आरोग्य

भेंडीची भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. भेंडी मध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस असतात. असं असलं तरी ही भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. जर काही आजारांमध्ये या भाजीचं सेवन केलं तर अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे कुणी भेंडीची भाजी खाऊ नये

किडनी स्टोन: किडनी स्टोन असल्यास भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतात, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो.

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या: भेंडी मध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे काही लोकात गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या होऊ शकतं; जसे की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन.

एलर्जी: काही लोकांना भेंडीची एलर्जी असते. ज्या लोकांना त्वचेवर रॅशेज, खाज किवा काही रिअ‍ॅक्शन असेल, तर त्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये.

हाय ब्लड प्रेशर: हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीत भरपूर पोटॅशिअम असतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)