त्वचेवर विष बाधा झाली तर करा हे घरगुती उपाय

आरोग्य

1) सध्या रोपवाटिकांमध्ये तसेच शेतकर्यांद्वारे वापरल्या जाणार्या अनेक कीटकनाशकांमध्ये मॅलेथिऑनसारखी घातक रसायने असतात जी आपल्या त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरात शिरून भयंकर परिणाम घडवू शकतात.

2)त्वचेतून खालील कारणाने विषबाधा होऊ शकते.

1) कीटकनाशकांशी झालेला प्रत्यक्ष संपर्क.

2) अंग थरथर कापणे, आकडी किंवा फिट येणे.

3) व्यक्तीचा बेशुद्धावस्थेकडे होणारा प्रवास.

काळजी कशी घ्याल (प्रथमोपचार)

1) संपर्क झालेली जागा भरपूर थंड पाण्याने नीट धुवा.

2) कपड्यांना संपर्क झाला असल्यास ते काळजीपूर्वक काढा मात्र हे करताना स्वतःच संपर्कात येऊ नका.

3) त्या व्यक्तीस धीर द्या व शांत झोपवून ठेवा.

4) तिला शक्यतितक्या लवकर दवाखान्यात न्या.

5) तिचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा – कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. कापडावर थंड पाणी घेऊन मान, पाठ व हातपाय चोळा.

6) तिला शक्यतितके थंड पाणी किंवा तसेच काही पिण्यास द्या.

7) तिला आकडी किंवा फिट येत नाही ना हे पहा.

8) व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तिला वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट स्थितीत झोपवा.

9) विषारी पदार्थाचा मूळ डबा किंवा बाटली जपून ठेवा कारण साधारणपणे त्यावरच विषावरील उतारा छापलेला असतो. आपल्या डॉक्टरांनीही ते पाहणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)