डोळ्यात गुलाल किंवा कचरा गेल्यावर करा ‘हे’ उपाय

आरोग्य

१) सुती कापड पाण्यामध्ये भिजवावे. या ओल्या कापडाने डोळ्यांच्या कडा हलक्याशा दाबाव्यात. फक्त हा दाब देत असताना डोळ्यामधील कोणत्याही जागेवर जोर पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

२) डोळ्यांवर गार पाणी शिंपडावे किंवा एका बशीत पाणी घेऊन १-२ सेकंदासाठी त्यात डोळा उघडझाप करावा. हे करत असतांना डोळ्यात पाणी जातं मात्र घाबरु नये. या साठी विशिष्ट आकाराचे कप ही मिळतात, ते ही वापरू शकतो.

३) अनेक वेळा पापण्यांवर धूळ साचते अशावेळी डोळ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या पापण्या खालच्या पापण्यांवर ठेवाव्यात आणि डोळ्यांची हळूहळू उघडझाप करावी.

४) डोळ्यात गुलाल गेल्यास डोळ्यावर हळूवार फुंकर मारावी.

5) डोळ्यात काही गेल्यावर त्या क्षणी डोळ्यांची उघडझाप करावी. जेवढ्या लवकर तुम्ही ही कृती कराल. तेवढा डोळ्यातील गुलाल किंवा इतर कचरा दूर होण्याची शक्यता जास्त असते.

(सोशल मीडियावरुन साभार)