खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते.
ब्लोटिंग आणि गॅस दूर करणारा उपाय
५ दिवस लागोपाठ एक खास पाणी बनवून प्याल तर पोटाचे छोटे-मोठे विकार लगेच दूर होऊ शकतात. हे मिश्रण प्यायल्यास पोटात वेदना, क्रॅम्प्स, ब्लोटिंग, डायरिया, बद्धकोष्ठता, जेवणानंतर वाटणारी अस्वस्थता दूर होऊ शकते. हे पाणी बनवण्यासाठी २ लिंबाच्या रसात अर्धा चमचा काळी मिरी आणि काळं मीठ टाका. आता यात दोन मोठे चमचे गरम पाणी टाका. हे मिश्रण तुम्ही ५ दिवस दुपाच्या जेवणाआधी प्यावं.
इतरही काही उपाय
ओव्याचं पाणी प्यायल्याने सुद्धा ब्लोटिंग आणि गॅसची समस्या कमी होते. तसेच पोटाला आरामही मिळतो.
आल्याचा चहा सुद्धा पोटासाठी खूप फायदेशीर असतो. यातील अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण पोटाच्या समस्या दूर करतात.
बडीशेप सुद्धा पोटासाठी खूप जास्त फायदेशीर असते. बडीशेपचं पाणी पिऊ शकता किंवा थेट खाऊ शकता.
कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्याल तरीही पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.
(सोशल मीडियावरून साभार)