शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

आरोग्य

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमता प्रभावित झाली असून स्पर्मच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहे. ब्रिटन येथे झालेल्या अध्ययनात धक्कादायक आकडे समोर आले आहे की 50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी 30 लाख होती जी आता कमी होऊन मात्र 4 कोटी 70 लाख झाली आहे.

ताण, लठ्ठपणा, अस्त-व्यस्त लाइफस्टाइल आणि प्रदूषण पुरुषांसाठी धोकादायक साबीत होत आहे. पुरुष आपल्या सवयी सुधारतील तरच ते बाप होऊ शकतील. येथे काही उपाय दिले आहे जे अमलात आणू उच्च गुणवत्ता असलेले स्पर्म तयार केले जाऊ शकतात.

स्मोकिंग सोडा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्मोकिंग पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी करतं आणि याने स्पर्मच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम ही होतो. म्हणून स्मोकिंग सोडणे आवश्यक आहे. याने मूत्रपिंडात ब्लड सप्लाय कमी होतं आणि ब्लड प्रेशर वाढतं.

रोज व्यायाम करा

रोज व्यायाम केल्याने लठ्ठपणा आणि ताण कमी होतो. याने शरीर स्वस्थ राहतं परंतू अती हार्ड वर्कआउट आणि ट्रेनिंग प्रोग्राम टाळा.

वजन नियंत्रण ठेवा

वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. पुरुष अधिक बारीक किंवा अधिक लठ्ठही नको कारण शरीराचे वजनच एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोनच्या स्तरावर प्रभाव टाकतं.

स्टीम बाथ टाळा 

आठवड्यातून एकदा सॉना बाथ किंवा गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे परंतू 40 डि.से. किंवा याहून अधिक तापमानापर्यंतही वाफ किंवा गरम पाणी आपल्या स्पर्मची संख्या कमी करतं.

खिशात मोबाइल नको

सतत मोबाइल खिशात किंवा लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेवणे टाळा. आपले अंडकोष या उपकरणांद्वारे निघणार्‍या उष्णतेपासून वाचवावे

टाइट अंडरवियर घालणे टाळा 

टाइट अंडरवियर किंवा जिन्स घालाल तर अंडकोष पर्याप्त स्पर्मचे उत्पादन करू शकणार नाही ज्याने स्पर्मच्या संख्येत कमी येईल.

अती कॉफी पिणे टाळा

रोज एक किंवा दोन कप कॉफी पिणे सामान्य आहे परंतू रोज अनेकदा स्ट्राँग कॉफी पिण्याने स्पर्मच्या संख्येवर परिणाम होतो. याने स्पर्मच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

(सोशल मीडियावरून साभार)