वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत ‘हा’ पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

आरोग्य

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत नाही. त्यामुळे कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागत आहे हा त्रास टाळण्यासाठी एक खास पदार्थ रोज घरातल्या सगळ्यांनीच खायला पाहिजे अगदी लहान मुलांनीही तो खायला पाहिजे.

सांधेदुखी, हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी उपाय

हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातला सगळ्यात उत्तम पदार्थ म्हणजे तीळ. त्यामुळे फक्त संक्रांतीच्या काळातच नाही तर रोजच साधारण १ चमचा तीळ तरी आपण नियमितपणे खायलाच पाहिजेत.

तिळांमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. पण त्यासोबतच फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम हे पदार्थही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे हाडं अधिक बळकट होण्यास मदत होते.

तीळ खाण्याची योग्य पद्धत

१) तीळ थोडेसे भाजून एका बरणीत ठेवा आणि दररोज सकाळी एक चमचा खा.

२) जर तुम्हाला नुसतेच भाजलेले तीळ खायला आवडत नसेल तर लसूण, लाल तिखट, जिरे घालून तिळाची खमंग चटणी करा आणि ही १ चमचा चटणी दररोज जेवणात तोंडी लावा.

३) जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असेल तर तीळ आणि गूळ घालून तिळाचे लाडू तयार करा किंवा चिक्की तयार करा आणि दररोज ती थोडी थोडी खा.

(सोशल मीडियावरून साभार)