१) शेंगा आणि कडधान्य: आपल्या व्हिडिओमध्ये रूजूता यांनी सांगितले आहे की अनेकदा आपण कडधान्य खाण्यावर अधिक लक्ष देतो. चपाती आणि तांदूळ यांसारखे कार्बोहायड्रेट्स खाणं सोडून देतो. पण जेव्हा आपण असे करतो तेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यापासून प्रतिबंधित करता येते.
२) डाळ: डाळ हा प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा एक पदार्थ आहे. डाळी खाल्ल्यानं शरीराला प्रोटीन्स मिळतात. तुम्हाला वरणाच्या स्वरूपात डाळ आवडत नसेल तर तुम्ही डाळ पराठाही खाऊ शकता. तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल त्यात डाळी घालू शकता.
३) ड्रायफ्रुट्स: आहारात बदाम, अक्रोडचा समावेश करा. चणे किंवा शेंगदाणेही तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता. रूजूता दिवेकर यांनी सांगितले की, पौष्टीक प्रथिनांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही लहान आरोग्यदायी बदल करू शकता
४) दुग्धजन्य पदार्थ: अन्नाचे हे कुटुंब प्रोटीन्सनी परिपूर्ण आहे तुम्ही दिवसातून एकदा तरी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करायला हवे. सकाळी १ ग्लास दूध पिणं असो किंवा दुपारच्या जेवणात दही भात खाणं असो आपण रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करायला हवा.
(सोशल मीडियावरून साभार)