हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी खजूर उत्तम पर्याय आहे. खजूर केवळ शरीराला उबदार ठेवत नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असतात, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. विशेषतः हिवाळ्याच्या काळात खजूर खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
रक्तदाब: रक्तदाबाची व्याधी असणाऱ्यांसाठी खजूर हे फळ एक वरदान आहे.
कमकुवतपणा: शरीरात सतत कमकुवतपणा असल्यास किंवा सतत सुस्ती येणाऱ्य़ांसाठी खजूर एक चांगला उर्जास्त्रोत आहे.
खजूर खाण्याची वेळ: अनेकांना मात्र खजूर खाल्ल्यानं शरीरावर कोणते परिणाम होतात हे लक्षात येत नाही. असं बऱ्याचदा खजूर खाण्याची वेळ चुकल्या मुळंही होतं.
योग्य वेळ: खजुर योग्य वेळी खाणं महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी उपाशीपोटी खजूर खाणं अतिशय फायद्याचं.
योग्य पद्धत: खजूर खाण्याची योग्य पद्धत म्हणजे, रात्रभर ते पाण्यात भिजवत ठेवून सकाळी उपाशी पोटी त्याचं सेवन करणं.
(सोशल मीडियावरून साभार)