मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त काही विशेष व्यवस्था करावी लागेल. भौतिक व सांसारिक दृष्टिकोनात बदल जाणवेल. आत्मसन्मानाशी संबंधित काम करताना सावधगिरी बाळगा. कामातील एखादी चूक अडचण निर्माण करू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अतिशय उत्तम आहे. मानसन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. घरात समाधानकारक वातावरण राहील. व्यवसायात नवे सहकारी मिळतील आणि कामे वेगाने मार्गी लागतील. सकारात्मक विचार ठेवा.
मिथुन: मिथुन राशीसाठी आज धावपळीचा दिवस आहे. काही गोष्टी तणाव वाढवू शकतात. संयम ठेऊन काम करा. पत्नीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. पाहुण्यांची वर्दळ वाढेल, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक ठरेल.
कर्क: कर्क राशीसाठी दिवस अनुकूल आहे. धनलाभाचे योग असून काही खर्चही संभवतात. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. कामावर लक्ष केंद्रित करा.
सिंह: सिंह राशीसाठी आज नशिबाची साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी होणारे बदल फायदेशीर ठरतील. व्यापारात सहकाऱ्यांशी सौहार्द ठेवा. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. घरात वातावरण समाधानकारक राहील.
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम आहे. तुमच्या कामामुळे मानसन्मान वाढेल. नोकरी वा व्यवसायात मौन राखणे हितावह ठरेल. वादविवाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तूळ: तूळ राशीसाठी दिवस चांगला आहे. धनप्राप्तीमुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. राजकारणात असाल तर प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी मंगलकार्याचा योग आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील, मात्र चौकशी करून निर्णय घ्या.
वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस ठीकठाक आहे. नोकरीतील प्रोजेक्ट पूर्ण होतील. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचा योग असून लाभदायक ठरेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
धनु: धनु राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. अडथळे दूर होतील. ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण राहील. अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. व्यापारासाठी नवीन योजना आखाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
मकर: मकर राशीसाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होऊन बँक बॅलन्स वाढेल. मानसिक तणाव कमी होईल. गोड बोलण्यामुळे विरोधक निष्प्रभ ठरतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा.
कुंभ: कुंभ राशीसाठी मेहनतीचा दिवस आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमचे निर्णय फलदायी ठरतील. विरोधक शांत राहतील. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभाग होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मीन: मीन राशीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होईल. आर्थिक अडचणी कमी होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः पोटाच्या तक्रारी संभवतात. सेवाभावी कार्यात खर्च कराल. मानसिक शांती लाभेल.