मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून खाल्ला पाहिजे.
मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.
कच्चा मुळा दररोज पहाटे अनुशा पोटी खाल्ल्याने काही दिवसातच कावीळ पूर्णत: बरी होते.
मुळा पाणीदार असल्याने याच्या सेवनाने भूक शमते. म्हणून वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी याचं सेवन करावं.
मुळा खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही होतो.
पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडा वेळ चावून थुंकून टाका. या उपायाने दात चमकदार होतील.
मुळा वजन कमी करण्यास लाभदायक आहे. जेवताना मुळा खाल्ल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्या पासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही नसतो.
ज्यांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, त्यांनी कच्चा मुळा खावा. मूळव्याध कमी करण्यास मुळा फायदेशीर आहे.
मुळ्यात असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, झिंक व बी-कॉम्प्लेक्स मुळे त्वचाविकार दूर होतात. यात भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.
(सोशल मीडियावरून साभार)