वजन कमी करण्यासाठी अनेक जण गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात. पण असं करत असताना योग्य डाएट घेणं आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम होतो. गाजर खावून तुम्ही वजन नियंत्रित करु शकता. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल, तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरात जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.
गाजराच्या ज्यूसचे फायदे
गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे त्वचेवर चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्यांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.
गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते, जे तणाव आणि चिंतामुक्त ठेवण्यास मदत करते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)