दात दुखतोय तर मग हे उपाय नक्की करुन पहा

आरोग्य

साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. दात किडल्यावर ती कीड पार दाताच्या डेंटल पल्प पोहचते. त्यामुळे होणाऱ्या वेदना डोक्यापर्यंत जातात.

दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो.

तुमच्या दातामध्ये दुखत असल्यास, त्या ठिकाणी कच्च्या कांद्याचा तुकडा ठेवावा. त्यामुळे पटकन दातदुखी बंद होते.

दातदुखीसाठी हिंगाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये दोन चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर या पाण्याने तुम्ही चूळ भरा. त्यामुळे लगेच दातदुखी बंद होईल.

दाताला कीड लागली असेल आणि त्यामुळे तुमचे दात दुखत असतील तर दोन चिमूट सैंधवमध्ये तिळाचं तेल घालून ही पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावा. असं केल्यास, तुमच्या कीड लागलेल्या दातातील वेग थांबतील.

दातदुखीसाठी लसूनदेखील एक चांगला उपाय आहे. लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवावी. काही वेळातच दातामध्ये येणारे वेग कमी होतील.

प्रत्येकाच्या घरात बटाटे तर असतातच. तुमच्या दातांमध्ये दुखत असल्यास आणि सूज आली असल्यास, बटाटा कापून त्याचे स्लाईस करून त्या भागावर साधारण 20 मिनिट्स ठेवा. लगेचच दुखणं बंद होईल.

दातदुखीपासून सुटका होण्यासाठी तुम्ही टी – बॅगचादेखील वापर करू शकता. गरम पाण्यात टी बॅग्ज ठेवा आणि तुमच्या दातदुखीच्या ठिकाणी शेका. यामुळे दुःख कमी होईल.

दातामध्ये खूप जास्त दुखत असेल तर 20 ते 25 मिनिटांपर्यंत बर्फ त्याच दातावर शेकवा, जिथे दुखत आहे. असं केल्यामुळे तुम्हाला लवकर सुटका मिळेल.

लिंबामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असतं. दात दुखत असलेल्या ठिकाणी लिंबाचा थेंब लावल्याने लगेचच तुमचं दुखणं थांबेल.

दात दुखत असल्यास, ब्रँडीचादेखील उपयोग केला जातो. तुमच्या घरी ब्रँडी असल्यास, कापसावर थोडी घेऊन दुखणाऱ्या दातावर लावा. तुमचं दुःख दूर होईल.

तुमचा जो दात दुखत आहे, त्यावर कापूर लावा. कीड लागल्याने दात दुखत असल्यास, त्या ठिकाणी कापूराचा चुरा भरा. दुखण्याबरोबर त्या कीड्यापासूनदेखील सुटका मिळेल.

दातदुखीासाठी आलंदेखील खूपच लाभदायी आहे. आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर सैंधव घाला. ज्या दातामध्ये दुखत आहे, तिथे आल्याचा तुकडा दाबून धरा. या दरम्यान तोंडात जे पाणी येईल, ते न गिळता थुंकत राहा. त्यामुळे दातदुखी 5 ते 10 मिनिटांत बंद होईल.

लवंग ठेचून त्यात लिंबाचा रस घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा दुखत असलेल्या दाताला लावा.

दातदुखीपासून सुटका मिळण्यासाठी फिटकरी पावडर दुखत असलेल्या ठिकाणी लावा. असं केल्यामुळे तुम्हाला दातदुखीपासून मुक्ती मिळेल.

दातदुखीची समस्या असल्यास, कडिलिंबाची तीन- चार पानं धुऊन घ्या. हे कडू असतं पण तरीही दातदुखीसाठी ही पानं चावा. यामुळे तुमचा त्रास बंद होईल.

व्हीटग्रास’ किंवा गव्हाचे लहानसे रोप खरेतर सहजी मिळत नाही. पण जर मिळालेच, तर ह्या रोपाची पाने किंवा गवत पाण्यामध्ये उकळून घेऊन त्या पाण्याने चुळा भरल्यासही दातदुखी कमी होते.

चिमुटभर हिंग घ्या. त्याला मोसंबीच्या रसात मिसळा. या मिश्रणात कापूस भिजवा आणि भिजलेला कापूस दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. याने आपल्या दातांचं दुखणे कमी होईल.

लवंगामध्ये औषधी गुण असतात. ज्यामुळे जंतू आणि इतर जीवाणू नष्ट होतात. लवंग दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. त्यामुळे दाताचे दुखणे कमी होते. परंतु दुखण कमी होण्यासाठी वेळ लागतो.

तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.

लवंगाच्या तेलाचे थेंब कापसाच्या बोळ्याने दुखणार्‍या दातावर लावावे. लवंगाचे तेल हा दातदुखी दूर करण्यास फारच उपयुक्त आहे.

सुंठ पावडर नसल्यास आल्याचा लहानसा तुकडा चघळत रहा. व आल्याचा रस दुखणार्‍या दाताकडे वळवण्याचा प्रयत्न करा.

निलगिरीच्या तेलामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासाठी निलगिरीच्या तेल कापसावर घ्या आणि दुखऱ्या भागावर लावा.

मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे अक्कल दाढीच्या दुखण्यातून आराम मिळू शकतो. यासाठी दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.

कांदा कापून त्याचा रस काढा तो रस कापसाच्या मदतीने दाढेला लावा.

पुदिन्याची पानं तुम्ही तुमच्या अक्कल दाढदुखीला कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. कारण पुदिन्याची पाने आणि पुदिना तेलामध्ये दाह कमी करण्याचे आणि थंडावा देणारे गुणधर्म असतात.

दाढेच्या दुखण्यावर आलं आणि लसणाची पेस्ट फायदेशीर ठरू शकते. यासाठी कच्च्या लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्या. दुखऱ्या भागावर अथवा अक्कल दाढी जवळच्या हिरडीवर या पेस्टने मसाज करा.

(सोशल मीडियावरुन साभार)