सर्दी झाल्यावर चुकूनही ह्या ३ गोष्टी करू नका

आरोग्य

सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी करू नये?

१. लगेचच गोळ्या- औषधी घेणे:- आपल्याला सर्दी होणार अशी चिन्हं दिसू लागली की लगेचच काही जण गोळ्या- औषधी घेऊन सर्दी दाबून टाकतात. पण असं करणं चुकीचं आहे. सर्दीमुळे आपल्या शरीरात जो म्युकस तयार झाला आहे, तो शरीराबाहेर पडणं गरजेचं आहे. कारण कोणत्यातरी ॲलर्जीमुळे, दुषित पदार्थ शरीरात गेल्यामुळे सर्दी होते आणि म्युकसच्या माध्यमातून ते घटक शरीराबाहेर पडत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया गोळ्या घेऊन बंद करून टाकू नका, असं डॉक्टर सांगतात.

२. वाफ न घेणे:- कारण वाफ घेतल्यामुळे नाक, घसा या भागात साचलेला कफ, म्युकस मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी झाल्यावर वाफ घेण्याचा कंटाळा करू नका.

३. मध घेण्याची चुकीची पद्धत:- अनेकजण सर्दी झाल्यावर गरम पाण्यात मध टाकून पितात. पण ही चुकीची पद्धत आहे. सर्दी झाल्यावर आवर्जून मध खा. कारण तो सर्दी- खोकला बरा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण तो पाण्यात टाकून पिऊ नका. त्याऐवजी एका चमच्यामध्ये मध घ्या. त्यामध्ये मीरेपूड, हळद, दालचिनी टाकून तो तसाच चाटून घ्या. या पद्धतीने मध घेतल्यास लवकर आराम मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)