डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

आरोग्य

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशात पालक भाजीचं नियमित सेवन केल्याने शरीराला काय काय फायदे मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर

पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक अॅसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं.

२) एनर्जी मिळते

पालकमध्ये फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि याद्वारे शरीराचा थकवा दूर करण्यास मदत मिळते.

३) डोळ्यांसाठी फायदेशीर

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि लूटिनसारखे महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

४) हाडे होतात मजबूत

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हाडांसंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो.

५) आतड्यांसाठी फायदेशीर 

पालक भाजीमध्ये फायबर भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. सोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

६) त्वचेसाठी फायदेशीर

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या तत्वांमुळे त्वचा चमकदार दिसते.

७) वजन नियंत्रित राहत

पालक भाजीमध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.

८) हृदयासाठी फायदेशीर

पालकमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयासाठी फायदेशीर असतं. याने हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.

९) मानसिक आरोग्य चांगलं राहत

पालक भाजीमध्ये फोलेट असतं, जे डिप्रेशन आणि स्ट्रेस लेव्हल कमी करण्यास मदत करतं.

1०) डिटॉक्सिफिकेशन

पालक भाजीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)