प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या

आरोग्य

कधी तरी प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या निर्माण होते. विशेषतः डेंग्यू, मलेरिया किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारात ही समस्या जास्त प्रमाणात होते. अशा वेळी रुग्णाला थकवा, अशक्तपणा, अंगदुखी, चक्कर येणे यासारखी लक्षणं जाणवतात. या स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच काही नैसर्गिक घरगुती उपाय मदत करू शकतात.

ताज्या पपईच्या पानांचा रस हा एक नैसर्गिक प्रभावी उपाय आहे. पपईच्या पानात नैसर्गिक एन्झाइम्स आणि पोषक घटक असतात, जे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यास मदत करतात. ताज्या पपईच्या पानांचा रस काढून त्यात शुध्द मध मिसळून पिल्यास हा परिणाम अधिक प्रभावी होतो. हा उपाय केवळ प्लेटलेट्स वाढविण्यासाठीच नाही, तर शरीरातील अशक्तपणा, रोगप्रतिकारशक्तीची कमतरता आणि थकवा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.

मधामुळे रसाचा स्वाद सुधारतो, तसेच त्यात असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स शरीराला अतिरिक्त ऊर्जा देतात. म्हणून, जर घरातील कुणाला डेंग्यू किंवा प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या असेल, तर डॉक्टरांच्या उपचारा सोबत हा सोपा आणि नैसर्गिक उपाय नक्की वापरून पहा. यामुळे बरे होण्याची प्रक्रिया जलद होते आणि शरीराची ताकद लवकर परत येते.

(सोशल मीडियावरून साभार)