लहान वयात ‘दमा’ होण्याची ‘ही’ आहेत कारणे आणि लक्षणे

आरोग्य

दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत. योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. साधारण 23 ते 27 टक्के लहान मुलांमध्ये दम्याचे मुख्य कारण वाढलेले वजन असते. ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.

ही आहेत कारणे
1) काही औषधे सतत घेतल्याने
2) मुलाचे जन्मावेळी कमी असलेले वजन
3)श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव
4) तणाव व शारीरिक कष्ट
5) हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपण
6) वाढते शहरीकरण
7) घरातील ऍलर्जिक घटक
8) वजन जास्त असण

ही आहेत लक्षणे
1) सतत खोकला येणे.
2) श्वास घेताना किंवा सोडताना आवाज येणे.
3) श्वास कमी घेता येणे.
4) छातीत वेदना होणे.
5) सतत घाबरणे.
6) अस्वस्थता जाणवणे.
7) सतत थकवा जाणवणे.

अशी घ्या काळजी
1) कपडे रोज गरम पाण्याने धुवावेत.
2) लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवा.
3) त्यांना वेळेवर औषधे द्यावीत.
4) इन्हेलर नेहमी जवळ ठेवा.
5) रोज हलका व्यायम करावा.
6) धूळ-मातीपासून दूर रहा.