पित्तासाठी हे नक्की करुन पहा…

आरोग्य

१) रात्रीचे जेवण शक्यतो लवकरच करावे.

२) सकाळी उठल्यावर साळीच्या लाह्या किंवा खजूर किंवा सफरचंद खावे.

३) दुपारी जेवण झाल्यावर झोपू नये.

४) Fermented वस्तू, दही, इडली, डोसा वर्ज्य करावे. दही खाल्लेच तर ताजे आणि सकाळीच खावे.

५) तूरडाळ वापरू नये.

६) शक्यतो दुपारी उन्हात फिरू नये. त्यामुळे migrain चा त्रास होऊ शकतो.

७) शरीर पण एक घड्याळ आहे. त्यामुळे जेवणाची वेळ शक्यतो बदलू नये.

८) लोणचे, पापड, तळलेले पदार्थ शक्यतो वर्ज्य करावेत.

९) “रागात पित्तं” म्हणजे राग आला तरी पित्त वाढते असे आयुर्वेदात वर्णन आहे. म्हणून फार राग, चिडचिड करू नये.

१०) अतिशय मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे पित्त वाढते व पोटात जळजळ होऊ शकते.

११) लसूण कितीही वातहारक व कोलेस्टेरॉल कमी करणारा असला तरी पित्त प्रकृतीच्या लोकांनी तो खाणे टाळावे. अगदीच खायचा झाल्यास तुपात तळून वापरावा असे ग्रंथात वर्णन सांगितले आहे.

१२) शेंगदाण्यातील नार पित्तकर असते. बऱ्याच जणांना जेवणात किंवा भूक लागल्यावर शेंगदाणे खाण्याची सवय असते.

१३) पालेभाज्या पचनासाठी चांगल्या असतात असे जरी असले तरी त्या पोटात गेल्यावर आंबट रसाच्या होतात, specifically मेथी. त्यामुळे पित्ताचा त्रास असेल तर मेथी कमी करावी.

१४) फळभाज्या खाणे पित्तासाठी चांगले असते.

१५) कोहळेपाक, मोरावळा, गुलकंद याचा नक्की वापर करावा.

१६) रात्रीची झोप साडे सात ते आठ तास होणे आवश्यक आहे. झोप न झाल्यास देखील पित्त वाढते आणि vice versa पण घडते.

१७) मानसिक स्वास्थ्य पण व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचे असते.

पित्तासाठी तुम्ही जेवढी lifestyle management व्यवस्थित ठेवाल तेवढे पित्त नॉर्मल व channelise राहते. त्यामुळे त्या पासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही आणि औषध न घेता सुद्धा पित्त व्यवस्थित manage राहू शकते.

(सोशल मीडियावरुन साभार)