१) चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी:- तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपतांना चेहर्यातवर लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.
२) उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी:- उष्णतेमुळे ओठाची व तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइस्चरायझिंग क्रीम लावून हळुवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.
३) चेहऱ्याखालची कांती उजळण्यासाठी:- एक चमचचा टोमॅटोचा गर ,चिमूटभर हळद,अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्या ला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.
४) केसातील कोंडा घालविण्यासाठी:- केसातील कोंडा फारच सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्या घरी औषध करता येईल.
५) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी:- आठवड्यातून किमान एकदा उतण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.
६) केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी:- केस धुतल्यावरही तेलकटपणा कमी न झाल्यास तीन लहान चमचे लिंबाचा रस घेऊन केस धुवून झाल्यावर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल.
७) ओठ फाटल्यास उपाय:- ओठ फातून त्यातून रक्त येत असल्यास कोकमचे तेल आणि शुद्ध गाईचे तूप यांचा वापर करावा.
८) उन्हाळ्यात वापरायचे कपडे:- उन्हाळ्यात घाम जास्त येतो. म्हणून या काळांत पांढर्याच रंगाचे तलम सूती कपडे वापरावेत. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.
९) उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून त्या पाण्याने आंघोळ करावी.
१०) कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल तर कच्च्या टोमॅटोला कुस्करून त्यात ताक मिसळून चेहर्याकला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. दररोज आंघोळीच्या आधी शरीराच्या उघड्या भागाला दही लावून १० मिनिटापर्यन्त तसेच राहू द्या.मग आंघोळ करा.
११) टोमॅटोची पेस्ट करून तिचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजातवाणा दिसतो. मुरूम,पुटकुलया,सुरकुत्या,काळे डाग दूर होण्यास मदत होते.
१२) रक्तदाब कमी करण्यासाठी:- ६-७ लसणाच्या पाकळ्या अर्धालीतर पाण्याच्या टाकून टी बाटली हलवावी व नंतर दोन तास तशीच ठेवावी. त्यानंतर तहान लागेल तेंव्हा त्या बाटलीतले पाणी प्यावे. असे पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो.