हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

आरोग्य

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत.

भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ करून पाहू शकता. थंडीत काही भाज्या न चुकवता खाल्ल्या पाहिजे. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.

चवळीची भाजी: ज्यांना रक्ताची कमी किंवा अॅनिमियाची समस्या आहे, त्यांनी चवळीची पालेभाजी जरूर खावी. चवळीच्या भाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने हे मुबलक प्रमाणात आढळतात.

चाकवत: चाकवत देखील खूप पौष्टिक आहे. खरं तर यात ८ प्रकारची जीवनसत्त्वेए, बी१ आणि व्हिटॅमिन सी आढळतात. या शिवाय कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम या सारखे पोषक घटक देखील यामध्ये आढळतात.

पालक: पालक ही थंडीच्या दिवसांचा उत्तम सोबती आहे. पालकामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई आढळते. या शिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड सारखे पौष्टिक घटक ही त्यात आढळतात.

गाजर: गाजराचा हलवा हिवाळ्यात सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. गाजर हलव्या व्यतिरिक्त, तुम्ही मिक्स व्हेज बनवण्यासाठी देखील गाजर देखील वापरू शकता. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक आढळतात.

बीटरुट: बीटरुट हे फळ आणि भाजी दोन्ही मानले जाऊ शकते. बीटरूट देखील अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर असे अनेक पोषक घटक आढळतात.

(सोशल मीडियावरुन साभार)